तुमचे आज रोजी वय मोजा.👇 http://shikshakm.blogspot.com/p/var-startyear-1900var-endyear-2099var.html
Posts
- Get link
- X
- Other Apps
प्रजासत्ताक दिनी सचित्र बालमित्र या उजळणी पुस्तकाचे वितरण. २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शालेय समिती अध्यक्ष श्री. सतीश दशरथ कोळी यांची उपस्थिती होती. श्री. सतीश कोळी हे नेहमीच शाळेला आणि विद्यार्थ्यांना आवश्यक मदत करत असतात. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी सचित्र बालमित्र या उजळणी पुस्तकाचे मोफत वितरण केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या पुस्तकामुळे शैक्षणिक दृष्टिकोनातून मोठे फायदे होणार आहेत. श्री. सतीश कोळी यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकता येईल आणि त्यांचा शैक्षणिक विकास साधता येईल. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल पाटील, सर्व शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांनी श्री. सतीश कोळी यांचे मनापासून आभार मानले.
- Get link
- X
- Other Apps
वर्षभरात विद्यार्थ्यांना तसेच पालकांना वर्षातील 365 दिवसांपेक्षाही अधिक वेळा घरी भेट देण्याचा आणि प्रत्यक्ष उपस्थिती वाढवण्याचा संकल्प. अर्थातच. ऑपरेशन थ्री 365+ "शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला चालना देण्यासाठी पालकांच्या भेटी घेतल्या जात आहे. या भेटींमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेतील नियमित उपस्थितीला प्रोत्साहन मिळेल." - शैलेश शिरसाठ.